
वसुंधरेच्या शालूचा उडाला रंग हिरवा, सिमेंटच्या काटयांनी तो किती जागी फाटावा ? सुधारणा आणि आधुनिकतेच्या नावाखाली, आता का तिनेही मिनीस्कर्ट घालावा? नेत्रांना सुखावणारे तिचे रूप, आता आग ओकताना दिसते हिरवाईने झाकणारी छाया आता, तप्त ज्वाळानी भाजते शीतलता, शुद्ध हवा नाहीशीच झाली, प्रदूषणाने जीवाची घालमेल वाढली तापमानाच्या वाढीने सोसेना काहिली, कारण फ़क्त एकच माणूस ज्याने माता आणि पर्यावरणाची, आब नाही राखली बेसुमार वृक्षतोड ठायी ठायी केली, पण झाडे लावण्याची गरज नाही जाणली वृक्ष आपले मित्र हेच तो विसरला, अन् झाडे लावण्यापेक्षा कापण्यातच सुखावला पण सारं काही यंत्रानीच साध्य होणार नाही, निसर्गाला अवहेलून पुढे जाता येणार नाही झाडे लावा झाडे जगवा, आज याची खरी गरज आहे कारण वसुंधरेच्या शालूतच, झाकलेली मानवा तुझी लाज आहे मानवा तुझी लाज आहे.
