Concept Note
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले विविध गड आणि किल्ले हे महाराष्ट्राचे खरे वैभव व महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आहे. काही अपवाद वगळता महाराष्ट्रातील या गड-किल्ल्यांची दूरवस्था झाली असून
त्यांची डागडुजी, जतन आणि संवर्धन याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही.
वाढलेले गवत, काटेरी झुडूप, पडलेल्या भिंती, ढासळत असलेले बुरुज, छपर उडालेली मंदिर, दुर्गंधी सुटलेली तलावातील पाणी, अक्षरशः कचराकुंडी झालेले किल्ले. हा आहे आपल्या शिवरायांचा वारसा? हेच दाखवणार आहोत का आपण पुढच्या पिढीला?
आपले किल्ले ऐतिहासिक वास्तू ही आपली शान आहे. विदेशी पर्यटक या वास्तुचे कौतुक करतात. स्थापत्य कलांचे उत्तम उदाहरण देणाऱ्या या वास्तुची देखभाल आपल्यालाच करायला हवी ना ! आपणच आपल्या अभिमानास्पद ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपायला हवे ना ! तर चला. आपली ऐतिहासिक पर्यटनस्थळे स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राहतील, अशी शपथ घेऊया.
या वर्षी मंडळाने असाच एक छोटासा उपक्रम राबविला, मंडळाचे कार्यकर्ते, आणि इतर दुर्गभ्रमंतीकार यांनी वेगवेगळ्या गडांवर जाऊन तेथील साफसफाई केली, यातून जमा झालेल्या कचऱ्यातून आपण गणेशोत्सव काळात देखावा उभारत आहोत. छत्रपतींचा महाराष्ट्रातील प्रवास या देखाव्यातून (3D पद्धतीने गिरगांवच्या राजाच्या भक्तांना अनुभवता येणार आहे.
गिरगांवच्या राजाच्या आशीर्वादाने मंडळाने हे शिवधनुष्य उचलले आहे, या वर्षी आपण गणेशोत्सव काळात उपस्थित राहून आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे हि विनम्र विनंती आहे. आपल्या उपस्तिथीची आम्ही वाट पाहत आहोत.
“जय गणेश, जय शिवराय”
धन्यवाद!
– निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ